पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा ) – पुणे शहरात १७ लाख रुपयांच्या खंडणीसाठी दोन महिलांचे अपहरण करुन त्यांना डांबून ठेवत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेप्रकरणात पोलिसांनी चार जणांना गजाआड केले आहे. बाबुलाल मोहोळ, अमर मोहिते, प्रदिप नलवडे आणि अक्षय फड अशी अटक केलेल्यांची नावे आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली. त्यानंतर या महिलांची सुटका करुन चौघांना अटक केली आहे. या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, अपहरण झालेल्या मिनाक्षी पोखरे या जागृती सोशल फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकारी आहे. पुणे रेल्वे स्थानकावर स्टॉल मिळवून देण्याचे सांगून त्यांनी आरोपींकडून १० लाख रुपये घेतले होते. या पैश्यांवरुन वाद सुरु होता. त्यातूनच हे अपहरण झाल्याचे बोलले जात आहे.
असे झाले अपहरण
उत्तमनगरमध्ये या आरोपींनी मिनाक्षी पोखरे व त्यांच्या सहकारी मनिषा पवार यांना अगोरदर बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना मारहाण करुन अपहरण करण्यात आले. त्यानंतर या दोन्ही महिलांना बाबुराव मोहोळ याच्या घरी नेऊन तेथे डांबून ठेवण्यात आले. त्यानंतर मुलीला फोन करुन १७ लाख रुपये आणून दे, नाही तर तुला व तुझ्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
Two women were kidnapped for ransom of Rs 17 lakh, four others were kidnapped