इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे – पूर्वी अमिताभ बच्चन यांचा कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम म्हणजे करोडपती करणारी एकमेव स्पर्धा होती. आता तसे नाही. आता ड्रीम ११ सारख्या अनेक ऑनलाईन गेम्सने ही संधी उपलब्ध करून दिली आहे. याच संधीचे सोने करत पुण्यातील एक पोलीस करोडपती झाला आहे.
पिंपरी-चिंचवडमधील या पोलीस उपनिरीक्षकाच्या करोडपती होण्याची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. सोमनाथ झेंडे या पोलीस उपनिरीक्षकाने बांगलादेश विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात ड्रीम एलेव्हन टीम लावली होती. त्यात त्यांना दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून त्यांनी ड्रीम इलेव्हन खेळण्यास सुरू केले होतं. झेंडे हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मुख्यालयात कार्यरत असतात. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावरती ड्रीम इलेव्हन ची टीम तयार केली ती अव्वल आली असून त्यामुळे सोमनाथ झेंडे हे करोडपती झाले आहेत.
त्यांच्या खात्यावर दोन दोन लाख रुपये येण्यास सुरुवात झाले असल्याची माहिती त्यांनी लोकसत्ता ऑनलाईन ला दिली. यामुळे झेंडे यांच्या कुटुंबालाही आनंद झाला आहे. ड्रीम इलेव्हनवर बंदी आणण्याची मागणी केली जाते आहे. तरीही पोलीस उपनिरीक्षकाला लागलेली ही लॉटरी चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या एक दिवसीय विश्वचषक सुरू आहे आणि आपण तो रेग्युलरी पाहतो असंही त्यांनी सांगितलं. तसंच क्रिकेटची आवड असल्याचंही सांगितलं.
PSI in Pune became a millionaire… got half a crore….