इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे : अलीकडच्या काळातील पुणे शहरातील अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या आढावा घेतला असता किंवा सोशल मीडियावरील वेब पोर्टल व ऑनलाईन बातम्यांचा मागावा घेतला असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे गुन्हेगारी क्षेत्रातील बातम्या मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. याला कारण म्हणजे पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने दररोजच वेगवेगळ्या ठिकाणी पुणे शहर व परिसरात नानाविध प्रकारचे गुन्हे घडतात, सर्व स्तरातील हे गुन्हे अत्यंत चिंतादायक म्हणावे लागतील. यामध्ये खून, मारामारी, हाणामारी, दुचाकींची जाळपोळ, चाकूने वार तरुणांचा विनयभंग महिलांवरील बलात्कार यासारख्या घटना आहेत. त्याचाच आता आणखी एक घटना समोर आली आहे. एका महिलेशी मैत्री संबंधातून काढलेली छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी देऊन एका माजी नगरसेविकेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
या फोटोमुळे काही विपरीत घडेल अशी त्या महिलेला कल्पना नव्हती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन काकडे (वय ४३, रा. कात्रज) यांच्याविरुद्ध एका नगरसेविकेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित नगरसेविकेचे मैत्री संबंध होते. दोघे अनेक ठिकाणी एकत्र फिरायला गेले असता त्यांनी काही फोटो काढले, मैत्रीच्या संबंधातून हे फोटो काढलेले होते. त्यामुळे या महिलेला असे काही घडेल विपरीत घडेल याची कल्पना नव्हती. मात्र त्या महिलेची सोशल मिडियावर छायाचित्रे, ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी काकडे याने दिली. त्यानंतर ती महिला घाबरून गेली, त्याने धमकावून नगरसेविकेवर वेळोवेळी बलात्कार केला. सन २०१७ पासून नगरसेविकेला धमकावून काकडे याने अत्याचार केले होते. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
वारंवार पैशाची मागणी करून केले ब्लॅकमेल
या संशयित इसमाने केवळ शारीरिक अत्याचारच केले नाही तर नगरसेविकेला धमकावून वेळोवेळी दहा लाख रुपये लुबाडले. त्यानंतर काकडे याने नगरसेविकेला धमकावत तुझ्या पतीला मैत्रीसंबंधाबाबत माहिती देतो, असे सांगून तिच्याकडून आणखी पैशांची मागणी करत वारंवार ब्लॅकमेल करीत होता. दोन दिवसांपूर्वी काकडे तिच्या घरी आला. मी तुझ्याशी विवाह करणार होतो मात्र तू दुसरा विवाह केला आहे. आता तुझ्यामुळे माझी पत्नी सोडून गेली आहे, असे सांगून त्याने तिला मारहाण केली. अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून त्या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. आता याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत मात्र या घटनेची परिसरात चांगलीच चर्चा सुरू आहे.
Former corporator raped…a shocking incident in Pune