शनिवार, ऑक्टोबर 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

असा रंगला पुणे फेस्टिव्हल, शुभारंभाला या मान्यवरांची उपस्थिती

सप्टेंबर 23, 2023 | 10:42 am
in राज्य
0
unnamed 63


पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्याच्या पर्यटनाला चालना देणाऱ्या आणि कला-संस्कृतीचे सुंदर दर्शन घडविणाऱ्या ३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे राज्याचे पर्यटनमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. पुणे फेस्टिव्हलमधील कार्यक्रमाचा दर्जा आणि कलाकारांना मिळणारे प्रोत्साहन पाहता हा महोत्सव ५० वर्ष पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त करून पर्यटन विभागातर्फे महोत्सवाला यापुढेही सहकार्य मिळत राहील अशी ग्वाही महाजन यांनी यावेळी दिली.

गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी, खासदार पद्मश्री हेमा मालिनी, रजनी पाटील, श्रीरंग बारणे, आमदार नाना पटोले, रवींद्र धंगेकर, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य समन्वयक अभय छाजेड, उल्हास पवार, रमेश बागवे, मीरा कलमाडी आदी उपस्थित होते.

पर्यटनमंत्री महाजन म्हणाले, सुरेश कलमाडी आणि या महोत्सवाचे घट्ट नाते आहे. ३५ वर्ष असा कार्यक्रम सुरू ठेवणे कठीण कार्य आहे. पण सर्वांनी मिळून प्रयत्नपूर्वक या महोत्सवात सातत्य ठेवले. महोत्सवातील कार्यक्रम पाहता पुणे संस्कृतीचे माहेरघर असल्याचे स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली आणि त्याला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. पुणे फेस्टिव्हलला भेट देण्याची अनेक वर्षांपासून इच्छा होती असेही महाजन म्हणाले.

पालकमंत्री पाटील म्हणाले, पुणे फेस्टिव्हलची देशभरात ‘मदर ऑफ ऑल फेस्टिव्हल’ अशी ओळख निर्माण झाली आहे. १९८९ पासून हा उत्सव सातत्याने सुरू आहे. हा कार्यक्रम अधिकाधिक सुंदर व्हावा यासाठी सुरेश कलमाडी यांनी खूप कष्ट घेतले, असे त्यांनी सांगितले. पुण्यात येऊन नृत्य सादर करणे ही गौरवाची बाब आहे. पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून देशभरातील कलाकारांचा सन्मान होत आहे, अशा शब्दांत खासदार हेमा मालिनी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. खासदार पाटील, बारणे, नाना पटोले, पद्मविभूषण डॉ. के.एल. संचेती, उद्योगपती संजय घोडवत यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

कलमाडी यांनी स्वागतपर भाषणात स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळावे आणि पुण्याचे नाव देशात जावे या उद्देशाने पुणे फेस्टिव्हलची सुरुवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या महोत्सवाने पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्याचे कार्य केले, असेही ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ अस्थिशल्य विशारद पद्मविभूषण डॉ.के.एच.संचेती यांना जीवनगौरव पुरस्काराने आणि उद्योगपती संजय घोडावत यांना पुणे फेस्टिव्हल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शतकपूर्ती वर्ष साजरे करणाऱ्या खडकमाळ आळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री त्रिशुंड गणपती विजय मंडळ ट्रस्ट आणि सदाशिवपेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचादेखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात ५० कलाकारांनी केलेल्या शंखनादाने झाली. पद्मश्री हेमा मालिनी आणि सहकलाकारांनी नृत्याद्वारे गणेश वंदना सादर केली. नंदिनी राव गुजर यांनी तुलसीदास रचित गणेश स्तुती सादर केली. सानिया पाटणकर यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे देशभक्तीपर गीत सादर केले. यावेळी सुखदा खांडकेकर आणि सहकाऱ्यांनी ‘नृत्य सीता’ हा रामायणातील सीता हरणानंतराचा प्रसंग नृत्य नाटिकेच्या माध्यमातून सादर केला.

नृत्यविष्काराच्या माध्यमातून वारकरी परंपरेचे दर्शन घडविण्यात आले. शर्वरी जमेनीस आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या ‘हिस्टोरीकल एम्पायर्स ऑफ इंडिया’ या नृत्याविष्काराला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रीयन मंडळ पुणेच्या खेळाडूंनी आर्टिस्टिक योगाच्या माध्यमातून भारतीय योग परंपरेचे अप्रतिम सादरीकरण केले. हेमा मालिनी यांच्या चित्रपट कारकीर्दीवर आधारित नृत्य सादरीकरणही यावेळी करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप लावणी फ्यूजनने झाला.
Pune Festival, the presence of these dignitaries at the inauguration

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गणेशोत्सव विशेष… तुज नमो… श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती… अशी आहे त्याची महती

Next Post

नाशिक शहरातील विविध गणेश मंडळांना मंत्री छगन भुजबळांनी दिल्या भेटी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

Home Flat e1681892298444
मुख्य बातमी

घरकुल बांधणीत या जिल्ह्याने रचला नवा विक्रम! ५० हजारांहून अधिक घरकुलांची पूर्ती…

ऑक्टोबर 22, 2025
PIC1OG8A
महत्त्वाच्या बातम्या

स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला लष्कराचा मिळाला हा बहुमान… गोल्डन बॉय आता या पदवीने ओळखला जाणार… 

ऑक्टोबर 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा भाऊबीजेचा दिवस… जाणून घ्या, गुरुवार, २३ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 22, 2025
IMG 20210302 WA0026
संमिश्र वार्ता

दिवाळीनंतर फिरायला जायचंय? या बीचवर नक्की जा… येथील अभूतपूर्व नजारा पाहून खुशच व्हाल…

ऑक्टोबर 22, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय… काढला हा शासनादेश… अशी मिळणार मदत…

ऑक्टोबर 21, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळी पाडव्याचा दिवस… जाणून घ्या, बुधवार, २२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 21, 2025
diwali padva balipratipada
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा- असे आहे महत्त्व

ऑक्टोबर 21, 2025
Untitled 42
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीत या ११ गोष्टी लक्षात ठेवा… ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी यांनी दिल्या या टीप्स…

ऑक्टोबर 21, 2025
Next Post
IMG 20230923 WA0135 1

नाशिक शहरातील विविध गणेश मंडळांना मंत्री छगन भुजबळांनी दिल्या भेटी

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011