इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे -शहरात गणेशोत्सवामुळे ड्रोनवर बंदी आदेश लागू करण्यात आले आहे. लक्ष्मी रोड परिसर येथे ड्रोनव्दारे व्हिडिओ शूटिंग करून ते instagramm वर upload करण्यात येत असले बाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी हे आदेश काढले आहे.
अशी शुटींग केल्यास aircraft act, Drone rule, IPC act नुसार गुन्हे दाखल होऊ शकतात असा इशाराही पोलीसांनी दिला आहे.या प्रकाराचा स्पेशल ब्रँच पुणे सीटी सोशल मीडिया सेल व्दारे डाटा कलेक्ट केला जात आहे. तरी अनधिकृत रित्या असे ड्रोन शुटींग तात्काळ बंद केले पाहिजे असे एसीपी रमाकांत माने यांनी सांगितले आहे.
पुण्यामध्ये गणेशोत्सवात गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. काल रविवार असल्यामुळे येथे गर्दीने उच्चांक मोडला होता. त्यात ड्रोनवर शुटींग करणारे मोठ्या प्रमाणात दिसत होते. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने हे आदेश काढले असावे असे बोलले जात आहे. रस्त्यावर होत असलेली गर्दी हे ड्रोनने दाखवून ते सोशल मीडियात पोस्ट केली जात असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.
Ban on drones during Ganeshotsav in this city,