बुधवार, सप्टेंबर 10, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पुणे येथे देव आनंद शताब्दी सोहळा, या चित्रपटगृहात चार दिवसांचा महोत्सव

by Gautam Sancheti
सप्टेंबर 22, 2023 | 5:32 pm
in राष्ट्रीय
0
F6dPnIFWcAABDVK

इंडिया दर्पण वृत्तसेवा
पुणे -सुप्रसिद्ध अभिनेते देव आनंद यांच्या १०० व्या जयंती निमित्त, २६ सप्टेंबर 2023 रोजी पुण्यात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी)- भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय ( एनएफएआय)च्या वतीने देव आनंद यांच्या सात चित्रपटांचे सादरीकरण केले जाणार आहे. देव आनंद यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या १०० व्या जयंती निमित्त त्यांचे चार सर्वोत्तम चित्रपट 4K रिझोल्यूशनमध्ये एनएफडीसी-एनएफएआयने, पुनर्संचयित केले आहेत. राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियाना अंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या चित्रपटांच्या जतनासाठी निधी दिला आहे. गाईड, ज्वेल थीफ, आणि जॉनी मेरा नामचे ३५ मिमी आणि सीआयडीचे ३५ मिमी डुप निगेटिव्हचे अत्याधुनिक आर्काइव्हल फिल्म स्कॅनरवर 4K रिझोल्यूशनमध्ये स्कॅन केले गेले आहे. संबंधित चित्रपट एनएफडीसी-एनएफएआयमधे तापमान आणि सापेक्ष आर्द्रता नियंत्रित वातावरणात अनेक दशकांपासून जतन केले गेले आहेत. दीर्घकालीन जतनामुळेच हे सार्वकालिक चित्रपट नवीन 4K तंत्रज्ञानात जतन करणे शक्य झाले आहे. या माध्यमातून, देव आनंद यांच्या कारकिर्दीची नव्या पिढीला ओळख करून देणे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करणाऱ्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा एनएफडीसी-एनएफएआयचा मानस आहे.

देव आनंद यांच्या जन्मशताब्दीच्या पार्श्वभूमीवर, एनएफडीसी-एनएफएआय गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या काही चित्रपटाच्या जतन-संवर्धनावर काम करत आहे. यात प्रत्येक फ्रेम-दृश्य काळजीपूर्वक जतन केले जात आहे. कालौघात त्यावर साचलेली धूळ, घाण, चरा किंवा तडा, छिद्र, ओरखडे आदी डिजिटल पद्धतीचा वापर करुन दूर केले आहेत.

३ तासांच्या चित्रपटात २.५ लाखांहून अधिक फ्रेम्स-दृश्य असतात, त्यावर काम करणे आवश्यक आहे. यानंतर रंगाची वर्गवारी केली जाते. जेणे करून चित्रपट प्रदर्शित करताना तो उत्तम दिसावा यासाठी रंग फिकट होण्यासारख्या समस्येचे निराकरण केले जाते. त्याचबरोबर चित्रपटाचा ध्वनी देखील डिजिटल माध्यमात जतन केला जात आहे. याची अंतिम प्रत तयार होईल तेव्हा प्रेक्षकांना वाटेल की जणू काही फोटोकेमिकल फिल्म लॅबमध्ये प्रक्रिया करून नवी कोरी ताजी प्रत आली आहे.

एनएफडीसी-एनएफएआय पुणे इथल्या मुख्य चित्रपटगृहात हा चार दिवसांचा महोत्सव होणार आहे. एनएफडीसी-एनएफएआयने विचारपूर्वक निवडलेले चित्रपट यात प्रदर्शित केले जातील. देव आनंद यांच्या “बाजी” (1951), “सी.आय.डी.” (1956), “असली-नकली” (1962), “तेरे घर के सामने” (1963), “गाइड” (1965), “ज्वेल थीफ” (1967), आणि “जॉनी मेरा नाम” (1970) या सिनेमातील दमदार अभिनयाचा आनंद प्रेक्षकांना घेता येईल. चित्रपटांचे सादरीकरण 35 मिमी प्रिंट्स आणि 4K जतनाचे मिश्रण असेल. यात, “बाजी”, “असली-नकली”, “तेरे घर के सामने” 35 मिमी प्रिंटमध्ये आणि “सी.आय.डी.”, “गाईड”, ” ज्वेल थीफ, आणि “जॉनी मेरा नाम” 4k रिझोल्यूशनमध्ये असतील. चित्रपट प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर आहे. पुनर्संचयित केलेले चित्रपट 23 आणि 24 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात पीव्हीआर आणि आयनॉक्समधेही प्रदर्शित केले जातील.
Dev Anand Centenary Celebrations Begin early at NFDC-National Film Archive of India

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबई – सेंट पीटर्सबर्ग सिटीमध्ये सामंजस्य करार; या समस्या सोडण्यासाठी मिळेल सहकार्य

Next Post

IND vs AUS; भारताला जिंकण्यासाठी २७७ धावांचे आव्हान, शामीने घेतल्या पाच विकेट

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी नवीन कामे व प्रवास टाळावे, जाणून घ्या, गुरुवार, ११ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 10, 2025
IMG 20250910 WA0350 1
स्थानिक बातम्या

शिलापूर येथील सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

सप्टेंबर 10, 2025
Untitled 9
आत्महत्या

नर्तिकेसाठी वेडा झालेल्या उपसरंपचाची आत्महत्या…नातेवाईकांचा घातपाताचा आरोप

सप्टेंबर 10, 2025
WhatsApp Image 2025 09 09 at 10.51.24 AM 1
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये या फाऊंडेनशतर्फे बंगाल फाईल्स चित्रपटाचे दोन शोज….८०० जणांची उपस्थिती

सप्टेंबर 10, 2025
rain1
संमिश्र वार्ता

राज्यात अशी असेल पावसाची स्थिती…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

सप्टेंबर 10, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 10, 2025
crime 88
क्राईम डायरी

घरफोडीची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडींमध्ये चार लाखाचा ऐवज लंपास

सप्टेंबर 10, 2025
crime11
क्राईम डायरी

फ्रॉडची ९ लाख ८० हजाराची रक्कम मुळ मालकास परत…नाशिकच्या सायबर शाखेस यश

सप्टेंबर 10, 2025
Next Post
F6oQpTEaIAAZIIU

IND vs AUS; भारताला जिंकण्यासाठी २७७ धावांचे आव्हान, शामीने घेतल्या पाच विकेट

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011