इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे : मुंबई आणि उपनगरांमध्ये प्रचंड लोकसंख्या आणि गर्दी असली तरी लोकलच्या व्यवस्थेमुळे काही प्रमाणात या गर्दीला शिस्त आहे असे वाटते, मात्र पुण्यामध्ये या उलट परिस्थिती आहे. पुणे शहर प्रचंड वेगाने वाढत असून नवनवीन वसाहतींमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या दिसून येते. त्याचबरोबर रस्त्यांचा विस्तार होत असला तरी वाहनांची संख्या अतिप्रचंड आहे, साहजिकच पुणे शहरात गेल्या चार-पाच वर्षात अपघातांचे मोठे प्रमाण वाढलेले आहे.
दररोज लहान मोठ्या रस्त्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे अपघात होतात. त्यातच आता एका मद्यपी युवकांनी बेधडकपणे कार चालवून पाच जणांना चिरडले. त्यात एक वृध्द व्यक्ती जागीच ठार झाली असून चार जण जखमी झाले आहेत. या प्रकरणामुळे तीव्र संताप व्यक्त होत असून दोषी कारचालकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नागरिकांनी दिला त्याला चोप
नारायण पेठ पोलीस चौकी तर झेड ब्रिज हा अत्यंत वर्दळीचा परिसर आहे, या ठिकाणी भरधाव वेगाने वाहने जात असतात. त्यातच नारायण पेठ पोलीस चौकीकडून चारचाकी वाहन झेड ब्रिजच्या दिशेने आलेल्या उमेश वाघमारे (वय ४८ ) या कारचालकाने दोन रिक्षांना धडक दिली, तसेच काही पादचाऱ्यांना उडवले. नटराज सूर्यवंशी (वय ४४ ) यांच्या मालकीची ती कार असून उमेश वाघमारे हा त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला आहे. उमेश याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर सुमारे चार जण जखमी झाले.
शुक्रवारी रात्री ही अपघाताची घटना घडली. या अपघाताची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत विश्वनाथ उपादे ( वय ६५ ) या वृध्द इसमाचा मृत्यू झाला तर रिक्षा चालक आणि काही वाहनचालक जखमी झाले. मद्यपी कारचालक उमेशला लोकांनी चांगला मार दिल्यानंतर पोलीसांच्या हवाली केले.
Drunk driver blew up… One killed, four injured… Incident in Pune city