इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुणे : पिंपरी चिंचवड परिसरातील ताथवडे येथील जेएसपीएम कॉलेज नजीक उभ्या असलेल्या सुमारे चार स्कूलबस बसला रविवारी दि. ८ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास अचानक आग लागल्यानंतर सुमारे तीन मोठे स्फोट झाले, यामुळे परिसरातील नागरिक भीतीने रस्त्यावर धावत आले मात्र ही आग कशामुळे लागली हे अद्याप ठोसपणे समजू शकले नाही. मात्र कॉलेजच्या बाजूला एका मोकळ्या प्लॉटमध्ये गॅस टँकर होता, त्याच प्लॉटमध्ये स्फोट झाला, असे सांगण्यात येते तर स्कूलबस या सीएनजी गॅस सिलेंडरवर चालणाऱ्या असल्याने त्याचा स्फोट झाला असेही म्हटले जात आहे.
पिंपरी चिंचवड शहर हे पुणे शहराप्रमाणेच दाट लोकवस्तीचे झाले असून पुणे आणि पिंपरी चिंचवड हे आता एकमेकात मिसळून गेले आहे, दोन्ही शहरांमध्ये वाढती रहदारी, रस्त्यांचे जाळे, लोकसंख्या आणि प्रचंड मोठ्या इमारतींची दाटी यामुळे सर्वत्र गर्दीचा महापूर दिसून येतो. मात्र रात्री काही प्रमाणात वर्दळ कमी असते, याचवेळी ताथवडे येथे जेएसपीएम कॉलेज परिसरात उभे असलेल्या स्कूल बसने स्कूल बसणे अचानकपणे पेट घेतला. त्यानंतर तीन मोठे स्फोट झाले, या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की, परिसरातील इमारतींमध्ये राहणारे नागरिक घाबरून रस्त्यावर आले होते. विद्यार्थी आणि नागरिक या स्फोटांच्या आवाजामुळे रस्त्यावर सैरावैरा धावत सुटले. धुरांचे लूट आणि ज्वाळा काही किलोमीटरवरून दिसत होत्या, याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. स्कूलबस या गॅसवरील असल्याने मोठा स्फोट झाल्याचे सांगितले आहे. मात्र या घटनेत किती लोक जखमी झाले व जीवित हानी झाली हे अद्याप समजले नाही, स्फोटाची तीव्रता जास्त असल्याने इमारतींना मोठे हादरे बसले. हा प्रकार नेमका कशामुळे घडला याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली.
टँकर चालक घटनास्थळावरून फरार
दरम्यान, काही जणांनी अग्निशामक दलाला तातडीने फोन केल्याने अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी लगेच दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते. सकाळी हा प्रकार कळल्यानंतर परिसरात पुन्हा एकदा गर्दी रस्त्यांवर गर्दी झाली त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून वरिष्ठ पातळीवर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. या कॉलेजच्या बाजूला एका मोकळ्या प्लॉटमध्ये गॅस टँकर होता, त्याच प्लॉटमध्ये स्फोट झाला.गॅस टँकर व मोठ्या व्यावसायिक सिलिंडरमधून गॅस चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना घडली. टँकर चालक मात्र घटनास्थळावरून फरार झाला आहे. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळाच्या बाजूला झोपड्या आहेत, जीवितहानी झाली आहे का, याची माहिती मिळण्याचे काम सुरू आहे.
Pune shook… 3 blasts one after the other at Tathwade… 4 buses burnt…