नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईल हॅक करून एकाने महत्वाचा डाटा डिलीट केल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात सिडकोतील ३७ वर्षीय व्यक्तीविरोधात आयटीअॅक्ट सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोबाईल हॅक करुन फोटो व्हिडीओ, कॉन्टॅक नंबर आणि महत्वाच्या दस्तऐवजाचा डिलीट केल्याची तक्रार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक सुभाषचंद्र कुलकर्णी (रा.अमित सागर अपा.अतुल डेअरी जवळ,उत्तमनगर सिडको) असे मोबाईल हॅक करणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी उमेश मधुसूदन कुलकर्णी (५६ रा.परशुरामनगर हिरापूररोड चाळीसगाव जि.जळगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे.
उमेश कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,गेल्या १३ ऑगष्ट रोजी रात्री हा प्रकार घडला. इंटरनेच्या माध्यातून उमेश कुलकर्णी यांचे दोन मोबाईल हॅक करून संशयिताने वैयक्तीक फोटो, व्हिडीओज, कॉन्टॅक नंबर आणि महत्वाचा डेटा डिलीट केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेख करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten