शनिवार, ऑक्टोबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरु: पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिवेशनापूर्वी जातांना केले हे आवाहन… (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 18, 2023 | 11:26 am
in राष्ट्रीय
0
narendra modi


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संसदेचे विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या नव्या संसदेत जाण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद मोदी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, या अधिवेशनाचा कालावधी छोटा असला तरी या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतला जाणार आहे. खासदाराने संसदेच्या कामकाजात भाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

संसदेचं अधिवेशन नव्या ठिकाणी होणार आहे. नव्या ठिकाणी जातानाच भारताला २०४७ पर्यंत आपल्याला विकसित राष्ट्र करायचे आहे. हे अधिवेशन अनेक प्रकारे महत्त्वाचं आहे. सर्व खासदारांनी या विशेष अधिवेशनातील कामकाजात जास्तीत जास्त भाग घ्यावा असं आग्रह मी खासदारांना करत आहे. जीवनात काही क्षण असे येतात की ज्यामुळे उत्साह वाढतो. त्यामुळे आता सर्व वाईट गोष्टी सोडून आपण चांगल्या गोष्टी घेऊन नव्या संसदेत जाऊया, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

यावेळी ते पुढे म्हणाले चांद्र मोहिमेचे यश, चंद्रयान-3 आपला तिरंगा फडकवत आहे. शिवशक्ती पॉईंट नवे प्रेरणा केंद्र बनले आहे, तिरंगा पॉईंट आपला अभिमान वाढवत आहे. जगभरात जेव्हा अशी कामगिरी केली जाते तेव्हा त्याला आधुनिकता, विज्ञान आणि तंत्र ज्ञानाशी जोडून त्याकडे पाहिले जाते. आणि जेव्हा हे सामर्थ्य जगासमोर येते, तेव्हा भारतासाठी अनेक शक्यता, अनेक संधी आपल्या दारात येऊन उभ्या राहतात. जी -20 चे अभूतपूर्व यश, जगभरातील नेत्यांचे 60 हून अधिक ठिकाणी स्वागत, विचारमंथन आणि संघराज्य रचनेचा खऱ्या अर्थाने जिवंत अनुभव भारताची विविधता, भारताची वैशिष्ट्ये, जी -20 आपल्या विविधतेचा उत्सव बनला. आणि आपण जी -20 मध्ये ग्लोबल साउथचा आवाज बनल्याचा भारताला नेहमीच अभिमान असेल. आफ्रिकन संघाला मिळालेले स्थायी सदस्यत्व आणि जी -20 मध्ये एकमताने जारी झालेले घोषणापत्र या सर्व गोष्टी भारताच्या उज्ज्वल भविष्याचे संकेत देत आहेत.

काल यशोभूमी या आंतरराष्ट्रीय परिषद केंद्राचे राष्ट्रार्पण करण्यात आले. काल विश्वकर्मा जयंती होती, देशातील पारंपरिक कौटुंबिक कौशल्ये असलेल्या विश्वकर्मा समुदायाला प्रशिक्षण, आर्थिक व्यवस्थापन, आधुनिक साधने देऊन नव्या प्रकारचे हे विश्वकर्माचे सामर्थ्य भारताला विकासाच्या प्रवासात पुढे वाटचाल करण्यासाठी आपले योगदान देऊ शकते. भारताचा अभिमान वाढवणारे असे विविध प्रकारचे उत्सवी वातावरण, उत्साहाचे वातावरण, उल्हासाचे वातावरण आणि संपूर्ण देशात एक नवा आत्मविश्वास आपण सर्वजण अनुभवत आहोत. त्याचवेळी संसदेचे हे अधिवेशन, या पार्श्वभूमीवर संसदेचे हे अधिवेशन, हे अधिवेशन छोटे असले तरी काळाच्या दृष्टीने खूप मोठे आहे. हे ऐतिहासिक निर्णयांचे अधिवेशन आहे. या सत्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे आता 75 वर्षांचा प्रवास नव्या टप्प्यावरून पुढे सुरू होत आहे. या टप्प्यावरचा 75 वर्षांचा प्रवास हा खूप प्रेरणादायी क्षण होता आणि आता तो प्रवास एका नव्या टप्प्यावरून पुढे नेत असताना, नवा संकल्प, नवी ऊर्जा, नव्या आत्मविश्वासासह 2047 च्या काळात या देशाला विकसित देश बनवायचेच आहे. त्यासाठी लागणारे सर्व निर्णय या नव्या संसद भवनात घेतले जाणार आहेत. आणि म्हणूनच संसदेचे हे सत्र अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे, मी सर्व आदरणीय खासदारांना आवाहन करतो की, अधिवेशन छोटे आहे, व्यथा मांडण्यासाठी खूप वेळ असतो तो कायमच असेल पण जल्लोषाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात जास्तीत जास्त वेळ त्यांनी या अधिवेशनात द्यावा. आयुष्यात असे काही क्षण असतात जे आपल्याला उत्साहाने भारून टाकतात, विश्वास निर्माण करतात, मी या छोट्या सत्राकडे त्या दृष्टीने पाहतो. मला आशा आहे की, जुन्या वाईट गोष्टींना मागे टाकून आपण चांगल्या गोष्टींसह नवीन सभागृहात प्रवेश करू आणि नवीन सभागृहात उत्तम गोष्टींचे मूल्य वाढवण्यात कोणतीही कसर सोडणार नाही, ही शपथ सर्व खासदारांनी घ्यावी. हा  एक महत्वपूर्ण क्षण आहे.

उद्या गणेश चतुर्थीचा पवित्र सण आहे. गणेशजींना विघ्नहर्ता मानले जाते, आता भारताच्या विकासाच्या प्रवासात कोणतीही विघ्न येणार नाहीत. भारत सगळी  स्वप्ने, सगळे संकल्प निर्विघ्नतेने पूर्ण करेल आणि म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी हा नवा आरंभ नव्या भारताच्या सर्व स्वप्नांचे मूर्त स्वरूप बनेल, म्हणूनच हे सत्र छोटे असले तरी अत्यंत मोलाचे  आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत जाण्यापूर्वी काय म्हटले हे बघा व्हिडिओमध्ये
This appeal was made by Prime Minister Narendra Modi before the session

PM @narendramodi's remarks at the start of Special Session of Parliament 2023

Watch: 👇https://t.co/aXyFvlKP6a

— PIB India (@PIB_India) September 18, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शांतिनिकेतनचा समावेश: पंतप्रधानांनी व्यक्त केला असा आनंद

Next Post

आश्चर्य! हाताला ७-७, पायाला ६-६ बोटे… २६ बोटांच्या मुलीचा जन्म… चर्चा तर होणारच…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
rape2
क्राईम डायरी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार…गुन्हा दाखल

ऑक्टोबर 9, 2025
crime1
क्राईम डायरी

कॉलेजरोड कंपनीचे शोरूम फोडून पावणे सतरा लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

ऑक्टोबर 9, 2025
cbi
संमिश्र वार्ता

लाचखोरी प्रकरणात सीबीआयने मुंबईतील सीजीएसटी अधीक्षक आणि निरीक्षकांना केली अटक

ऑक्टोबर 9, 2025
girish mahajan
महत्त्वाच्या बातम्या

खऱ्या अर्थाने संकटमोचक… हा निर्णय घेणारे गिरीश महाजन राज्यातील पहिलेच मंत्री… अन्य मंत्रीही आदर्श घेणार?

ऑक्टोबर 9, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या ९ ऑक्टोबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
F6O 8RuaUAAuqoG

आश्चर्य! हाताला ७-७, पायाला ६-६ बोटे... २६ बोटांच्या मुलीचा जन्म... चर्चा तर होणारच...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011