इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
गेल्या काही महिन्यांमध्ये विमानात गैरप्रकार, गैरवर्तणुकीचा प्रकार वाढला आहे. याचा सामना मल्याळम अभिनेत्री दिव्या प्रभा हीला करावा लागला आहे. विमान प्रवासादरम्यान सहप्रवाशाने तिच्याशी आक्षेपार्ह वर्तणूक केल्याची घटना पुढे आली आहे.
मुंबई ते कोची असा विमान प्रवास करताना मल्ल्याळम अभिनेत्री दिव्या प्रभाबरोबर धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अभिनेत्रीने यासंदर्भात केरळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. अभिनेत्री मुंबईहून कोचीला जाणाऱ्या एअर इंडिया फ्लाइट एआय ६८१ मधून ९ ऑक्टोबरला प्रवास करत होती. यावेळी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सहप्रवाशाने प्रवासादरम्यान गैरवर्तणूक केल्याचा आरोप दिव्या प्रभाने केला आहे. दिव्याने या धक्कादायक घटनेती माहिती सोशल मीडियावर दिली आहे. अभिनेत्री या पोस्टमध्ये लिहिते,‘एअर इंडियाच्या विमानात १२सी या सीटवर एक प्रवासी मद्यधुंद अवस्थेत बसला होता. काही वेळाने तो १२बी या सीटवर येऊन बसला आणि मी १२ए या सीटवर बसले होते. थोड्यावेळाने या प्रवाशाने उगाच भांडण करायला सुरुवात केली. आधी त्याने जागेवरून वाद घातला, त्यांनंतर शारीरिक गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.’
एअरहोस्टेकडून कुठलीही कारवाई नाही
मी यासंदर्भात एअरहोस्टेसकडे तक्रार करून मदतीची मागणी केली. परंतु, त्यांनी त्या प्रवाशावर कोणतीही ठोस कारवाई केली नाही, केवळ त्याला दुसऱ्या जागेवर बसवण्यात आले. कोची विमानतळावर उतल्यावर मी ही समस्या विमानतळ आणि एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांना सांगितली. त्यांनी तात्काळ कारवाई करत सहप्रवाशाने केलेल्या गैरवर्तनासंदर्भात तक्रार नोंदवली, असे दिव्या प्रभाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
Misbehavior on the plane with this actress…