इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क –
पाकिस्तानमध्ये दोन टोकाची चित्रे बघायला मिळतात. एकीकडे उपासमार, गरिबी आणि दुसरीकडे गडगंज श्रीमंती. त्यामुळे पाकिस्तानवर सदैव रडण्याचीच वेळ असते. अशात पाकिस्तानच्या क्रिकेट टीमने एखादी मालिका जिंकली की उत्साह निर्माण होतो तेवढाच. पण आता महिलांच्या बाबतीत म्हणाल तर पाकिस्तानला आपले यशही स्वीकारायचे नसते. सध्या अशाच एका प्रकरणावरून पाकिस्तानची खिल्ली उडविली जात आहे.
पाकिस्तानी सौंदर्याबद्दल कायमच बोलले जाते. पण दुर्दैवाने पाकिस्तानात मुलींना, महिलांना स्वातंत्र्य नाही. त्यांना सदैव बंधनात ठेवले जाते. त्यामुळे त्या सौंदर्याला जागतिक व्यासपीठावर पोहोचण्याची संधीच मिळत नाही. अशात तेथील काही तरुणींनी सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला आणि त्यानंतर पाकिस्तानमधील पुरुषी अहंकाराला जो काही धक्का बसला आहे, त्याचे वर्णन न केलेलेच बरे.
मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी आधी त्या त्या देशांमध्ये स्पर्धा होत असते. तेथे अव्वल ठरलेली स्पर्धक जागतिक स्पर्धेत भाग घेऊ शकते. तशीच ‘मिस पाकिस्तान’ अशी स्पर्धा मालदिव्जमध्ये घेण्यात आली. दुबईच्या एका कंपनीने त्याचे आयोजन केले. त्यात हीरा इनाम, एरिका रॉबीन, जेसिका विल्सन, मालिका अल्वी आणि शबरिना वसीम या पाकिस्तानी तरुणींनी भाग घेतला. त्यात एरिका रॉबिन ही अव्वल ठरली.
ती ख्रिश्चन असली तरीही पाकिस्तानी आहे. त्यामुळे तिचे नाव पुढे येताच पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अनवार-उल-हक काकड यांच्यासह असंख्य पाकिस्तानी पुरुषांचा इगो दुखावला गेला. नग्न खेळात पाकिस्तानचे नाव आलेच कसे, या स्पर्धेला पाकिस्तानचे नाव कुणी दिले, आयोजकांच्या मुसक्या आवळा, एरिकासारख्या तरुणींना लाज वाटली नाही का अशा असंख्य प्रश्नांच्या माध्यमातून रणकंदन सुरू झाले आहे.
पुढे काय होणार?
एरिका रॉबिन हिची जागतिक स्पर्धेसाठी निवड तर झाली, पण पाकिस्तानचे सरकार तिला त्यात सहभागी होऊ देईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी एरिकाने केलेली सगळी तयारी व्यर्थ जाण्याचीही शक्यता आहे. यापूर्वी अशाप्रकारच्या स्पर्धांमध्ये रंगमंचावर अंगावरील कपडे खाली पडण्याचे प्रकार झाले आहेत, शिवाय इंडोनेशियात काही तरुणींना टॉपलेस होण्यास भाग पाडले होते. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. अशात एरिका रॉबिनचे पुढे काय होईल, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Even success is not accepted by Pakistan itself! How come the beauty pageant name? Discussion around the world