नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निफाड येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट तर्फे विकसित केल्या जाणारे ड्रायपोर्ट प्रगतीपथावर असल्याचे दिसते. या ड्रायपोर्ट साठी निफाड सहकारी साखर कारखान्याची जागा हस्तांतरित करून घेण्याच्या उद्देशाने जेएनपिटी तर्फे सुमारे १०८ कोटी रुपये महसूल खात्याकडे वर्ग केले असे जेएनपीटीचे डेप्युटी चेअरमन उमेश वाघ यांनी सांगितल्याची माहिती भाजपा उद्योग आघाडी राज्य प्रभारी प्रदीप पेशकार यांना दिली.
या प्रकल्पाचा पाठपुरावा जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी केला त्यात केंद्रीय मंत्री डॉ .सौ.भारतीताई पवार यांच्या पाठपुराव्याला यश आले त्याबद्दल भारतीय जनता पार्टी, उद्योग आघाडीच्या वतीने उद्योजकांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री डॉ.सौ. भारतीताई पवार यांची भेट घेऊन अभिनंदन करुन आभार मानले. या प्रकल्पा साठी भाजपा जेष्ठ नेते सुरेशबाबा पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. तसेच डॉ.प्रशांत पाटील व इतर पदाधिकारी यांनी पाठपुरावा केल्याचेही पेशकार यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून या ड्रायपोर्टची उभारणी होणार आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील कृषी माल, फळे, तसेच औद्योगिक उत्पादने यांचे निर्यातीचे लक्ष्य कमी वेळात व कमी खर्चात पूर्ण होऊ शकते. कृषिमाल विदेशात पाठवताना वेळेची मर्यादा लक्षात घेता या पोर्टचा उपयोग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. अनेक फार्मर प्रोड्युसर कंपनी व निर्यातदार शेतकरी या प्रतीक्षेत होते.
या ट्रायपोर्टमुळे जिल्ह्याच्या निर्यातकांची खूपच मोठी सोय होईल आणि जिल्ह्यात ॲग्रो प्रोसेसिंग या क्षेत्रात नवनवीन उद्योग येण्यास चालना मिळेल असे मत भाजपा उद्योग आघाडीचे राज्य प्रभारी प्रदीप पेशकार यांनी व्यक्त केले. यावेळी हेक्झागाॅन लि.चे प्रेसिडेंट अरुण ओम लाल व इतर उद्योजक उपस्थित होते.
Pradeep Peshkar of BJP Industry Alliance gave this information about the dry port being developed at Niphad.