निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील खडक माळेगावचे सुपुत्र, भारतीय लष्कराचे जवान योगेश सुकदेव शिंदे यांचे शुक्रवारी सायंकाळी अपघाती दुःखद निधन झाले. गावी सुटीवर आले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जवान योगेश याने भारतीय सैन्यामध्ये भरती होऊन कुटुंबासोबत देशाची देखील सेवा केली. परंतु काल अचानक दुर्दैवी अपघातामध्ये दुःखद निधनाने शिंदे कुटुंबावर तसेंच गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जुलै महिन्यात निफाड तालुक्यातील धानोरे येथील भारतीय सैन्य दलातील जवान श्रीराम राजेंद्र गुजर या लष्करी जवानाचा शिंर्डी येथून दुचाकीवरुन परत येत असतांना अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. ते शिर्डी येथून साईबाबाचे देवदर्शन करुन आपल्या नातेवाईकांकडे जात असतांना ही घटना घडली होती. श्रीराम यांच्यासोबत असलेला मावसभाऊ अक्षय उर्फ बबलू पांडुरंग जावळे यालाही जबर मार लागल्याने त्यांचाही जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर याच तालुक्यातील अपघाताची ही घटना घडली आहे.
अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांकडून श्रध्दांजली
भारतीय सैन्यात कार्यरत असलेले आपल्या नाशिक जिल्ह्यातील खडक माळेगावचे (ता. निफाड) सुपुत्र योगेश सुखदेव शिंदे यांच्या अपघाती निधनाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. भारतमातेच्या या वीर सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली ! गावी सुटीवर आले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. शिंदे कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो व मृतात्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या श्रध्दांजली संदेशात म्हटले आहे.
Accidental death of jawan who came on leave… Incident in Niphad taluka