गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

उदगीरला राज्य तर नाशिकला १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा महोत्सव

by India Darpan
डिसेंबर 30, 2023 | 11:18 pm
in राज्य
0
unnamed 2023 12 30T231606.877 e1703958504470

लातूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील युवकांचा खेळासह, सांस्कृतिक आणि इतर सर्व क्षेत्रात सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी शासन कटिबद्ध असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून आशियायी स्पर्धेतील सहभागी खेळाडूसह, पदक विजेत्या खेळाडूंच्या बक्षिसाच्या रक्कमेत, तालुका, जिल्हा आणि विभागा पातळीवरच्या क्रीडा संकुलाच्या निधीत मोठी वाढ करण्याचा निर्णय क्रीडा व युवक कल्याण विभागाने घेतला. उदगीर येथे राज्य युवा महोत्सव पार पडत असून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 12 जानेवारीला नाशिकला राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करत असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

उदगीर येथे तालुका क्रीडा संकुलावर आयोजित राज्य युवा महोत्सवाचे उदघाटन श्री . बनसोडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुधाकर शृंगारे, माजी आमदार गोविंद केंद्रे, क्रीडा विभागाचे सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके, ऍड. व्यंकट बेंद्रे, प्रशांत पाटील यांच्यासह शिवछत्रपती पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने आशियायी स्पर्धेतील विजेत्या सुवर्ण पदक विजेत्याला 1 कोटी, रौप्य पदक विजेत्याला 75 लाख आणि कांस्य पदक विजेत्या खेळाडूला 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला असून आता आशियायी खेळात सहभागी होणाऱ्या खेळाडूंनाही 10 लाख रुपये देण्याचा निर्णय क्रीडा विभागाने घेतल्याची माहिती राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली. राष्ट्रीय स्तरावर 29 ऑगस्ट हा मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा होतो, तसाच ऑलिम्पिकमध्ये भारताचे नाव उज्वल करणाऱ्या कुस्तीपटू कै. खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्म दिवस राज्याचा क्रीडा दिन आपण घोषित केल्याची माहिती या वेळी श्री. बनसोडे यांनी दिली.
देशात आणि राज्यात खेळाला मोठे प्रोत्साहन दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा क्षेत्रातही मोठे बदल घडून आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात आपला देश जगात खेळाच्या क्षेत्रातही उज्वल कामगिरी करेल. देशातले युवक खेळाकडे आता करियर म्हणून पाहत आहेत हे चित्र खूप आशादायी आहे, असे प्रतिपादन खासदार श्री. शृंगारे यांनी केले.
यावेळी जिल्ह्यातील आणि राज्यातील राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते, शिव छत्रपती पुरस्कार विजेते यांचा विशेष गौरव करण्यात आला.

उदगीरकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी
राज्य युवा महोत्सवा मध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून दोन एक हजार कलाकार सहभागी झाले आहेत. त्यांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्यातील काही गटांनी खुल्या मंचावर आपल्या कलेचे सादरीकरण केले. उदघाटनानंतर इंडियाज गॉट टॅलेंट या प्रसिद्ध शो मधील चमुने सादर केलेल्या नृत्याला उदगीरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले, तर कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन प्रसिद्ध अभिनेत्री समीरा गुजर यांनी केले.

तृणधान्य प्रदर्शनीचे उद्घाटन
जागतिक तृणधान्य वर्षानिमित्त युवकांना अन्नातील पोषणमूल्य कळावे, यासाठी कृषी विभागाकडून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात राज्यातील विविध जिल्ह्यानी सहभाग नोंदविला आहे. त्याचे उदघाटन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबई ते अयोध्या रेल्वे सुरू व्हावी….मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मागणी

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या धाम येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे केले उद्घाटन…ही आहे वैशिष्ट्ये

India Darpan

Next Post
Untitled 228

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या धाम येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे केले उद्घाटन…ही आहे वैशिष्ट्ये

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011