इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रायगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ताम्हिणी घाटात ट्रॅव्हल्स बस पलट झाल्याची घटना घडली. या अपघातात २ महिलांचा मृत्यू तर ५५ जण जखमी झाले आहे.
या सर्व जखमीना मानगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुणे येथील कंपनीची सहल खासगी बसने हरिहरेश्वरला जात असताना सकाळी साडेसात वाजता हा अपघात झाला. ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ०४ एफके ६२९९ हा आहे.
आज पहाटे ही बस पुण्याहून हरिहरेश्वरला निघाली व काही तासातच हा अपघात झाला. या बसमध्ये ५७ प्रवासी प्रवास करत होते. घाटात चालकाचा बसवरचा ताबा सुटल्यामुळे ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. या अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती.