नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खरं तर कायदा कोणीच हातात घेऊ नये..पण एखादा प्रसंग असा असतो की त्यावर ती कृती संतापात होत असते. अशीच घटन नागपुरात वाठोडा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली. या ठिकाणी बिडगाव परिसरात शुक्रवारी सकाळी एका अपघातात बहीण-भावाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून देत वाहनाची तोडफोड केली.
या अपघातात दुर्गानगर येथील रहिवासी असलेले सुमित नंदलाल सैनी (वय १८ दुर्गानगर) आणि अंजली सैनी (वय १६) हे भाऊ-बहीण ठार झाले. पडले. त्यानंतर येथील जमाव संतप्त झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पण, त्याअगोदरच जमावाने ट्रकला आग लावली.
ट्रकला आग लागल्यानंतर अग्निशामक दलाने आग नियंत्रीत केली. पण, त्यात ट्रकचे नुकसान झाले. एखाद्या घटनेत तरुण भाऊ बहिण ठार होणे ही संताप आणणारी घटना आहे. त्यामुळे संतप्त जमावाने हे कृत्य केले असले तरी ते कायदा हातात घेण्यासारखे आहे.