नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभेत भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपचे दानिश अली यांना दहशतवादी म्हणून संबोधल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भर संसदेत दहशतवादी संबोधल्यामुळे विरोधकांनी भाजपविरोधात हल्ला चढवला आहे. या सर्व प्रकारचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकाराबद्दल माफी मागितली. पण, विरोधकांचे माफीमुळे समाधान झालेले नाही. त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
राजद खासदार मनोज झा म्हणाले की, संसदेत खासदारासाठी असे शब्द वापरले गेले असतील तर मुस्लिम, दलित यांच्या विरोधात कोणत्या भाषेला वैधता देण्यात आली आहे, याचा विचार करायला हवा. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजप नेत्याची टिप्पणी अत्यंत निषेधार्ह आहे आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माफी मागितली असली तरी ती अपुरी असून त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी.
बघा संसदेमधील हा व्हिडिओ…..