इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली. पण, या यादीत छगन भुजबळांना कोणतीच जबबादारी देण्यात आली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात भुजबळ हे जेष्ठ मंत्री असून ते ओबीसीचे नेते आहे. पण, या सुधारित यादीत त्यांना वगळले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रकात पाटील यांचा विरोध असतांनाही देण्यात आले. पण, भुजबळांसाठी हा विरोध शिंदे व फडणवीस यांनी स्विकारला नाही.
सुधारीत यादीत राष्ट्रवादीच्या वाट्याला ७ पालकमंत्रीपद वाट्याला आले. पण, त्यात भुजबळ नाही. पालकमंत्रीपदासाठी रायगड, सातारा व नाशिक येथे शिंदे गटाचा विरोध होता. त्यामुळे येथे कोठेही पालकमंत्रीपद देण्यात आले नाही. त्यात भुजबळांना हवे असलेले नाशिकही मिळाले नाही. या ठिकाणी शिंदे गटाचे दादा भुसे हेच आता पालकमंत्री राहणार आहे.
सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदात पुणे- अजित पवार, अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील, सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील, अमरावती- चंद्रकांत दादा पाटील, भंडारा- विजयकुमार गावित, बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील, कोल्हापूर- हसन मुश्रीफ, गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम, बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे, नंदूरबार- अनिल भा. पाटील, वर्धा – सुधीर मुनगंटीवार यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. यात उत्तर महाराष्ट्रातून फक्त राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल भा. पाटील यांना पालकमंत्रीपद मिळाले आहे.
NCP got 7 Guardian Minister posts, but Chhagan Bhujbal is nowhere?