मुबंई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ट्विटरचे (X) नियम न पाळल्याने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. या टीव टीव मुळे अजित पवार गटाला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीत फुट झाल्यानंतर दोन्ही गटांनी राष्ट्रवादी आमचीच हा दावा केला आहे. त्यात हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे असतांना ट्विटरने कारवाई केली आहे.
अजित पवार गटाकडून ट्विटरवर NCPspeaks_official असे नवीन अकाऊंट तयार करण्यात आले होते. हेच अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. पण, शरद पवार गटाच्या ट्विटर अकाऊंट @NCPSpeaks हे मात्र ॲक्टिव आहे. आता ट्विटरने कोणत्या नियमाने हे अकाऊंट सस्पेंड केले हे मात्र समजू शकले नाही.
पण, शरद पवार गटाकडून केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे अकाऊंट सस्पेंड आहे. अकाऊंट सस्पेंड आहे. त्यानंतर अजित पवार गटाकडून सांगण्यात आले की, ट्विटरला मेल केला आहे. या मेलमध्ये आपली भूमिका मांडली आहे. लवकरच त्यांचे हँडल पुन्हा सक्रिय होईल.
Twitter account of Ajit Pawar group of NCP suspended, this is because…