इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. च्या वतीने नाशिक शहरातील विविध मार्गांवर सार्वजनिक बससेवा पुरविण्यात येते. याच बस सेवेअंतर्गत मार्ग क्रमांक २०४ नाशिकरोड ते अमृतानगर या मार्गावर देखील बससेवा पुरविण्यात येते. सद्यस्थितीत मार्ग क्रमांक २०४ नाशिकरोड ते अमृतानगर मार्गे द्वारका, वनवैभव, पाथर्डी फाटा मार्गे बससेवा पुरविण्यात येते. मात्र प्रवाश्यांची होणारी मागणी लक्षात घेता आता या मार्गात बदल करण्यात येत आहे. त्यानुसार मार्ग क्रमांक २०४ नाशिकरोड ते अमृतानगर मार्गे आंबेडकर नगर, अशोका मेडीकव्हर, पाथर्डी गाव या मार्गे बसेस मार्गस्थ होतील. हा बदल मंगळवार ३ ऑक्टोंबर २०२३ पासून अंमलात येणार आहे.
मंगळवार ३ ऑक्टोंबर २०२३ पासून मार्ग क्रमांक २०४ मध्ये बदल करण्यात आले असले तरी बसफेर्यांच्या वेळात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. याची प्रवाश्यांनी नोंद घ्यावी. मार्ग क्रमांक २०४ वर उपलब्ध असलेल्या बसफेर्या पुढील प्रमाणे –
नाशिकरोड डेपो ते अमृतानगर – ५.५०, ६.५० वाजता
अमृतानगर ते नाशिकरोड डेपो – १७.३०, १८.४० वाजता
नाशिकरोड ते अमृतानगर – ८.००, ९.३०, १०.००, ११.३०, १२.००, १३.३०, १४.१०, १५.३०, १६.१०, १७.४० वाजता
अमृतानगर ते नाशिकरोड – ६.५०, ८.१०, ९.००, १०.३०, ११.००, १२.३०, १३.००, १४.३०, १५.१०, १६.३० वाजता
मार्ग क्रमांक २०४ वरील मार्गात करण्यात येणारे बदल मंगळवार दिनांक ३ ऑक्टोंबर २०२३ पासून अंमलात येणार असून यासंदर्भात प्रवाश्यांना कोणतीही अडचण असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास ८५३००५७२२२ / ८५३००६७२२२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.