नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –मिलन व टाईम बाजार जुगार खेळणा-या दोन जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. दिंडोरीरोडवर उघड्यावर हे दोघे जुगार खेळत होते. या जुगारींच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे दोन हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत भास्कर गवारे (४२ रा.कोळीवाडा म्हसरूळ) व दिपक अशोक बैरागी (२६ रा.लक्ष्मण रेखा सोसायटी जवळ,जुना आडगाव नाका) अशी अटक केलेल्या जुगारींची नावे आहेत. म्हसरूळ गावातील जैन मंदिर परिसरात काही तरूण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने हा छापा टाकला. संशयित एका टपरीच्या बाजूला उघड्यावर मिलन व टाईम बाजार जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले.
संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य असा सुमारे १ हजार ९४० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई पंकज चव्हाण यांनी फिर्याद दाखल केली असून अधिक तपास पोलिस नाईक फुलपगारे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten