नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जुना सायखेडा रोडवर भरधाव दुचाकी घसरल्याने ३७ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. विरेंद्र राजेंद्र डांगळे (३७ रा.भगवती दर्शन अपा.बोधलेनगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
डांगळे गुरूवारी (दि.१४) जेलरोड भागात गेले होते. सायंकाळी आपल्या दुचाकीवर ते घराकडे परतत असतांना हा अपघात झाला. जुना सायखेडा रोडने ते प्रवास करीत असतांना दिवे बंगला भागात भरधाव दुचाकी घसरली या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने प्रतिक आहिरे यांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल करण्यात आले.
येथे वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत पोलिस नाईक गायकवाड यांनी दिलेल्या खबरीवरून उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक पवार करीत आहेत.
२० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – २० वर्षीय युवकाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना मखमलाबाद शिवारातील पडोळमळा भागात घडली. अथर्व बाळासाहेब थेटे (२० रा.आर.के.ग्लोरी सोसा.पडोळमळा जवळ मखमलाबाद) असे मृत युवकाचे नाव आहे. अथर्वच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अथर्व थेटे या युवकाने गुरूवारी (दि.१४) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्यास कपडा बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ ऋषीकेश थेटे यांनी त्यास तात्काळ अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. तुषार खैरे यांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत डॉ.केतन गावंडे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten