नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबड औद्योगिक वसाहत मध्ये असलेल्या कंपनीत ४० हजार रूपये किमतीचे कॉपर लॅमेनिशन नोकराने चोरुन नेले. कंपनीच्या स्टोअररूममध्ये हे कॉपर लेमिनेशन ठेवलेले होते. ते नोकरानेच चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धिरज कुंदन भंगाळे (रा.नाशिक) असे संशयित नोकराचे नाव आहे. याप्रकरणी कृष्णा तुकाराम रोकडे (रा.शिवाजीनगर,सातपूर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. रोकडे यांची अंबड औद्योगीक वसाहतीत धनराज स्वीच गेअरर्स प्रा.लि.नावाची कंपनी आहे.
या कंपनीत संशयित नोकरीस होता. सोमवारी (दि.११) दुपारच्या सुमारास कुणाचे लक्ष नसल्याची संधी साधत संशयिताने स्टोअर रूममधील लॉकरमध्ये ठेवलेली ४० हजार रूपये किमतीचे कॉपर लॅमेनिशन चोरून नेले. अधिक तपास पोलिस नाईक सावळे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten