नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट कागदत्राच्या आधारे नाशिकरोडला सह दुय्यम निबंधक वर्ग २ यांच्याकडे दुस-याचा फ्लॅट परस्पर नावावर करून त्यावर तीन लाखाचे कर्ज काढल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुळ मालकाने पोलिसात धाव घेतली असून दोघांविरूध्द नाशिकरोड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जगदिश सुधाकर गांगुर्डे (रा.विधातेनगर,हिरावाडीरोड) व प्रशांत शंकरराव शिवले (रा.पिंपळगाव ब.ता.निफाड) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पुंडलीक अर्जुन मौले (५७ रा.आर्य कन्या सोसा.स्नेहनगर दिंडोरीरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. मौले यांच्या मालकिच्या फ्लॅटचे संशयितांनी ८ जून २०११ ते २० जून २०२३ दरम्यान बनावट कागदपत्राच्या आधारे नाशिकरोड येथील सह दुय्यम निबंधक वर्ग २ यांच्याकडे परस्पर खरेदी केली.
फ्लॅट नावावर होताच संशयितांनी त्यावर तीन लाख रूपयांचे गहाण खत पावती करून फसवणुक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत. या फसवणूक प्रकरणी दोघांविरूध्द नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten