नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लाखलगाव येथे ३३ वर्षीय महिलेचा मृतदेह शेतातील विहीरीत आढळून आला. सदर महिलेने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. घरात कुणासही काही एक न सांगता ही महिला निघून गेली होती. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रतिक्षा अवधुत चिखले (३३ रा.लाखलगाव ता.जि.नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रतिक्षा चिखले या सोमवारी (दि.११) सायंकाळ पासून बेपत्ता होत्या. घरात कुणासही काही एक न सांगता त्या निघून गेल्या होत्या.
कुटुंबिय त्यांचा सर्वत्र शोध घेत असतांना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील विहीत आढळून आला. याबाबत अवधुत चिखले यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार डापसे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten