नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेत जमीन बनावट कागदपत्राच्या आधारे परस्पर नावे करून घेतल्याप्रकरणी सहा जणांविरूध्द नाशिकरोड पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात डॉक्टर वकिलाचाही समावेश आहे. हा प्रकार दुय्यम निबंधक कार्यालयात घडला आहे.
याप्रकरणी दत्तात्रेय विश्वनाथ गुरव (६३ रा.गगणगिरी सोसा.गायके कॉलनी दत्तमंदिर जवळ) यांनी तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय रामचंद्र सोनवणे (६९ रा.कमल निवास,वास्को हॉटेलजवळ,ना.रोड), डॉ. राजेंद्र हरी कोतकर (६२ रा.संगमेश्वर नगर,चेहडी पंपीग), विश्वास माधव राऊत (रा.जेलरोड), एम.व्ही.पटेल (रा.दत्तमंदिर ना.रोड), श्रीकांत भगतराम साधवानी (रा.ना.रोड) व अॅड. सुरेश तुकाराम भोसले (रा.जेलरोड) अशी संशयिताची नावे आहेत. .
गुरव यांची नाशिकरोड परिसरात शेतजमीन आहे. संशयितांनी गुरव त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या या जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून परस्पर नावे करून घेतली. हा प्रकार गेल्या २६ मे रोजी घडला. कट कारस्थान करून संबधितांनी त्याबाबत नाशिकरोड येथील दुय्यम निबंघक कार्यालयात नोंदणी केली असून ही बाब समोर येताच गुरव यांनी पोलिसात धाव घेतली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten