नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -फुलेनगर भागात हमाली कामाच्या वादातून तीन महिलांसह एकाने तरूणास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत कुणीतरी लोखंडी हत्यार मारल्याने तरूण जखमी झाला असून, याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार झुलाबाई दादा चव्हाण,आक्का शिंदे, सलमा व सनी शिंदे (रा. सर्व वैशालीनगर,फुलेनगर) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी बॉबी बजरंग गुंजाळ (१८ रा.नवनाथ किराणा शेजारी,वैशालीनगर पेठरोड) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. संशयित महिला आणि तक्रारदार हे मार्केट यार्डात हमाली काम करतात. हमाली कामाच्या कारणातून त्यांच्यात वाद झाला होता. या रागातून ही घटना घडली.
गुंजाळ गेल्या रविवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमासात घर परिसरातील नवनाथ किराणा दुकान भागात गेला असता संशयित महिला व त्यांच्या साथीदाराने त्यास शिवीगाळ केली. यावेळी गुंजाळ याने समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता संतप्त महिलांसह एकाने त्यास दमदाटी करीत बेदम मारहाण केली. या हाणामारीत कुणीतरी काही तरी हत्याराने वार केल्याने गुंजाळ जखमी झाला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten