नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोयत्याचा धाक दाखवत दहशत निर्माण करणा-या तरूणास पोलिसांनी गजाआड केले आहे. ही कारवाई विहीतगाव येथील स्मशानभुमी भागात करण्यात आली. संशयिताच्या ताब्यातून लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपक राजाराम पगार (४० रा. आण्णाभाऊ साठे नगर,देवळाली गाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. विहीतगाव येथील स्मशानभुमी कडून साठेनगर कडे जाणाºया मार्गावर एक इसम दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार शुक्रवारी (दि.१५) पोलिसांनी धाव घेत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. पगार याच्या अंगझडतीत धारदार कोयता मिळून आला असून याबाबत पोलिस कर्मचारी आनंद घुमरे यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलिस नाईक नवनाथ होलगिर करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten