नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – द्वारका भागात हद्दपारीची कारवाई केलेली असतांनाही शहरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरबाज मोईन बागवान (२३ रा. म्हाडा वसाहत,भारतनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. बागवान याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांनी त्यास दोन वर्षांकरीत शहर आणि जिह्यातून हद्दपार केले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर असतांनाच शुक्रवारी (दि.१५) रात्री तो द्वारका भागात मिळून आला.
याबाबत पोलिस शिपाई गणेश बोरणारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार सोनार करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten