नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुंभमेळ्यासह इतरही वेळेत रेल्वेच्या कोचची निगा राहावी, कोचची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी तसेच रेल्वे कोचचा मेंटेनन्स वेळेत आणि जलद गतीने व्हावा यासाठी नाशिक येथे कोच दुरूस्ती व मेंटनन्स डेपो उभारण्यासाठी खासदार गोडसे यांच्याकडून सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांना यश आले आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे कोच डेपो निर्मितीसाठी रेल्वे प्रशासनाने पन्नास कोटी रूपयांच्या निधीला तत्वतः मान्यता दिली आहे. कोच डेपोमुळे नाशिकच्या उद्योगात भर पडणार असून रोजगार निर्मितीस मोठ्या प्रमाणावर चालना मिळण्यार असल्याची माहिती खा.गोडसे यांनी दिली आहे.
नाशिक येथे रेल्वे कोचच्या दुरुस्ती आणि मेंटेनन्ससाठी डेपोची निर्मिती व्हावी यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खा. गोडसे प्रयत्नशील होते. दरम्यानच्या काळामध्ये याकामी खा.गोडसे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह भुसावळ,मुंबई आणि दिल्ली स्थित रेल्वे प्रशासनाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. खा.गोडसे यांनी कोच डेपोची उपयुक्तता प्रशासनाच्या निदर्शनासआणून दिली होती. २०२७ ला नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा भरणार असून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे कोच दुरूस्ती डेपो होणे किती गरजेचे आहे याचे महत्त्व खा.गोडसे यांनी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते.
कोच डेपोची निर्मिती करण्याविषयी खा. हेमंत गोडसे यांची मागणी न्यायिक असल्याने विभागाने या कामी प्रस्ताव तयार करून नाशि येथे कोच दुरुस्ती व मेंटनन्स डेपोच्या निर्मितीसाठी नुकतेच रेल्वे प्रशासनाने पन्नास कोटी रुपयांच्या निधीला तत्वतः मान्यता दिली आहे. कोच डेपोमुळ राज्यातील विविध रेल्वे मालगाड्या आणि प्रवाशी रेल्वे गाड्यांच्या कोचच्या मेंटेनन्सचे कामे जलद गतीने होणार आहेत. कोच दुरुस्ती व मेंटनन्स डेपो निर्मितीच्या प्रस्तावास रेल्वे प्रशासनाने पन्नास कोटी रुपयांच्या निधीला तत्वतः मान्यता दिली असून अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव लवकरच रेल्वे बोर्डाकडे सादर होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.
Approval of Depot for Railway Coach Repair and Maintenance at Nashik