नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने महामार्गावरील एका ढाब्यावर टाकलेल्या छाप्यात अवैध मद्यसाठा जप्त करुन दोन जणांना गजाआड केले आहे. या ठिकाणी ग्राहकांना देशी विदेशी पुरवठा केला जात होता. या कारवाईत पोलिसांनी सुमारे साडे नऊ हजार रूपये किमतीचा दारूसाठा जप्त केला आहे. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंकर कुमार उमेश राम (मनपा शाळे मागे,आडगाव) व भवन अरविंद सिंग (रा.दहावा मैल,आडगाव शिवार) अशी अटक करण्यात आलेल्या मद्यविक्रेत्यांची नावे आहेत. याबाबत पथकाचे पोलिस नाईक भुषण सोनवणे यांनी फिर्याद दिली आहे. महामार्गावरील हॉटेल अपना ढाबा येथे बेकायदा मद्यविक्री होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.
त्यानंतर मंगळवारी (दि.७) पोलिसांनी छापा टाकला असता संशयित ग्राहकांना देशी विदेशी दारूचा पुरवठा करतांना मिळून आले. संशयितांना बेड्या ठोकत पोलिसांनी या ठिकाणाहून रोकडसह दारू साठा असा सुमारे ९ हजार ३३७ रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अरूण पाटील करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten