दीपक ओढेकर, नाशिक
आशियाई स्पर्धेत रोइंग प्रकारात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी पहिली नाशिककर होण्याचा मान प्रसिद्ध रोइंगपटू मृण्मयी साळगावकर हिने हॅंगझाऊ येथे १९ व्या आशियाई स्पर्धेत रुबाबात मिळविल्यानंतर आता त्याच स्पर्धेत रोइंग मधील पहिली आशियाई पदकविजेती होण्याचा मान आणि संधी तिच्या उत्कृष्ट आणि कौशल्यपूर्ण खेळाने तिला प्राप्त झाली आहे !
सिंगल स्कल या प्रकारात ती राष्ट्रीय विजेती आहे पण आशियाई स्पर्धेत ती उध्या रविवारी (ता २४/९/२३) भारतीय वेळेनुसार सकाळी ठीक ८ वा २० मि कॉक्सलेस फोर (coxless4 ) या प्रकारात पी बाबू, पी डी थांग्जॅम आणि रुक्मिणी अशा भारतीय संघासह मैदानात (खरंतर पाण्यात) पदकविजेत्या अंतिम लढतीत उतरेल .
भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचलेल्या एकूण सहा प्रतिस्पर्धी संघाबरोबर सहाव्या लेन मध्ये असेल तर भाग घेणारे इतर संघ थायलंड (लेन१), व्हियेतनाम (लेन२), चीन (लेन३), जपान (लेन ४) आणि हॉंगकॉंग (लेन ५) मध्ये असतील .
खेळात निश्चित अंदाज वर्तविणे अवघड असले तरीही मृण्मयीचे नाशिकमधील तिचे जुनियरचे प्रशिक्षक अंबादास तांबे यांच्या मते मृण्मयीचा संघ पहिल्या तीन मध्ये नक्की दिसणार म्हणजेच मृण्मयी भारताला आणि नाशिककराना पदकाची भेट देणार ! तिला भरभरून शुभेच्छा !
सोमवारी देखील मृण्मयी कॉक्स्ड ८ (coxed8 )या प्रकारात अंतिम फेरी खेळणार आहे आणि त्याही स्पर्धेत ती पदकासाठि दावेदार असेल .त्याबद्दल सविस्तर माहिती उद्या !
The medal of this player from Nashik is certain…