नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील वाहतूक वेगाने तसेच प्रवास विना खड्डे आणि विनाआयास व्हावा यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून नॅशनल महामार्ग विभागाकडे सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांना यश आले आहे. पिंपळगाव -नाशिक -गोंदे या दरम्यानच्या महामार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून येत्या आठ महिन्यात वरील महामार्गाच्या काँक्रिटीकल्पाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियाची शेवटची मुदत २८ ऑक्टोबर पर्यंत असणारा असून काँक्रिटीकरण करण्यात येणाऱ्या महामार्गाची एकून लांबी साठ किलोमीटर इतकी असणारा माहिती खासदार गोडसे यांनी दिले आहे.
पिंपळगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ असून रोज पिंपळगाव येथून कांद्याने भरलेले शेकडे ट्रक नाशिककडून मुंबईकडे ये -जा करत असतात.महामार्गावर कायमच मोठ्या प्रमाणावर मोठ- मोठे खड्डे पडत असल्याने या महामार्गावरून वाहने अतिशय कमी वेगाने धावत असतात.परिणामी कांद्याने भरलेले ट्रक तसेच नाशिकसह उत्तम महाराष्ट्रातून मुंबईकडे जाणारे प्रवासी आणि वाहन चालकांची मोठी कुचंबणा होत आहे.यातून प्रवासी तसेच वाहनचालकांना दिलासा मिळावा यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खासदार गोडसे प्रयत्नशील होते.यातूनच काही महिन्यांपूर्वी रस्ते व विकास प्राधिकरण विभागाने पिंपळगाव ते गोंदे या दरम्यानच्या महामार्गाच्या काँक्रीटीकरण्याच्या कामासाठी दोनशे पंच्याहत्तर कोटींचा निधी मंजूर केलेला आहे.
पिंपळगाव -नाशिक – गोंदे या महामार्गाच्या कामाला लवकरात लवकर प्रारंभ व्हावा यासाठी खा. गोडसे यांनी नॅशनल हायवे प्रशासनाकडे सततचा पाठपुरावा केल्याने आता या कामाच्या संदर्भात भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाकडून निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.निविदा भरण्याची अंतिम मुदत ऑक्टोंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आहे.पिंपळगाव -नाशिक – गोंदे या दरम्यानचा महामार्ग सहापदरी असून आठ महिन्यात या महामार्गाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. काँक्रिटीकरणामुळे महामार्ग अधिक मजबूत होणार असून खड्डेमुक्त होणार आहे. यामुळे ठरवल्या वेळेत नाशिकसह उत्तम महाराष्ट्रातील प्रवाशांना,वाहनचालकांना मुंबईत जाणे – येणे सोपे होणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.याकामी नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट डायरेक्टर साळुंखे आणि कार्यकारी अभियंता दिलिप पाटील आदी अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
The tender process for the concreting work of Pimpalgaon to Gonde highway has started