इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक – केंद्र सरकार व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत जनतेला सणासुदीच्या काळात स्वस्तात चणाडाळ मिळावी यासाठी युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व मदत फाउंडेशनचे संस्थापक अंबादास खैरे यांनी उपक्रम राबवला. यात ग्राहकांना त्यांनी अवघ्या ६० रुपये किलो दराने चणाडाळ दिली आहे. यामुळे नाशिक शहरातील ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
“भारत डाळ” या नावाने किलोभर चणाडाळ अवघ्या ६० रुपयांत उपलब्ध करून देण्यात येत आहे. पंचवटी येथील अंबादास खैरे यांच्यातर्फे त्यांच्या संपर्क कार्यालात २००० किलो डाळीचे वाटप करण्यात आले. केंद्र शासनाकडून भारत डाळ या नावाने सर्व सामान्य गोरगरीब जनतेस परवडेल अशा दराने चना डाळीची विक्री सुरु केली आहे. १ किलो बॅगसाठी ६० रुपये प्रतिकिलो या अनुदानित दराने वाटप करण्यात येत आहे.
पंचवटी परिसरातील महिला व नागरिकांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद लाभला असून अत्यंत उत्साहात कार्यक्रम पार पडला. नाशिक शहरातील विविध भागात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सदरचा उपक्रम लवकरच राबविण्यात येणार असल्याचे अंबादास खैरे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास श्रमिक सेनेचे बाळासाहेब पाठक यांचे सौजन्य लाभले. यावेळी दीपक पाटील, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, सागर तांबे, राम शिंदे, राज रंधवा, पप्पू शिंदे, विनायक जाधव, जयदीप सोळंकी, कौस्तुभ जथे, अमर गोसावी, रोहित जाधव, शुभम पाटील, हेमंत दळवी, सचिन अहिरे आदींसह मोठ्या संख्येने परिसरात महिला व नागरिक उपस्थित होते.