इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नांदगाव शाखेतील विविध खात्यात जमा असलेले १५ लाख ५६ हजार रुपये मिळावें या मागणीसाठी रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाच्या साकोरा येथील विद्यार्थी व शिक्षकांनी थेट बँकेच्या कार्यालयातच ‘ शाळा ‘ भरवली.. त्यामुळे या अनोख्या आंदोलनामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले.
साकोरालीत या शाळेतील शिक्षकांनी या बँकेच्या कार्यालयातच ज्ञानदानाचे काम सुरू केले. शाळेची इमारत मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेत बसावे लागते. त्यामुळे सध्या शाळेच्या नव्या इमारतीचे कामास खात्यावरील पैसे मिळावे म्हणून हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात थेट बँकेच्या कार्यालयातच शाळा भरविल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, जिल्हा बँकेच्या केंद्रीय कार्यालयाशी संपर्क साधून काही रक्कम तातडीने देण्याबाबत वरिष्ठांकडून आश्वासन मिळाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. गेल्या काही महिन्यापासून जिल्हा बँक अडचणीत आहे. त्यामुळे अनेकांचे पैसे या बँकेत अडकले आहे. त्यामुळे हे पैसे मिळावे यासाठी शिक्षकांनी हे आंदोलन केले.
In order to get money from the bank, the teachers built the school in the bank