जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा पेटले असून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळे येथील वाल्मिक बोरगुडे यांनी सरण रचत त्यावर बसत आगळ्या-वेगळ्या पद्धतीने उपोषणाला बसत मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी-मराठा प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही. हे आमरण उपोषण सुरु राहील, असे मनोज जरांगे पाटील यांनी काल स्पष्ट केले. शुक्रवारी मुंबईत जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकही पार पडली. या बैठकीला जरांगे पाटील फोनच्या माध्यमातून जालन्यातून उपोषणस्थळाहून उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीनंतर उपोषण मागे घेतले जाईल असे बोलले जा होते. पण, जरांगे पाटील यांनी सरकारच्या जीआरमध्ये किरकोळ दुरुस्ती राहिली असे सांगत उपोषण मागे घेण्यास नकार दिला.
त्यामुळे त्यांच्या या भूमिकेला आता सर्वत्र पाठींबा मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील नैताळे येथे थेट सरणावर बसत आंदोलन करुन येथील आंदोलकांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Naitale andolan to support Manoj Jarange