नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक महापालिकेच्या मुख्यालयात प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंगळवारी बैठक संपन्न झाली. या बैठकीत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने गणेशोत्सव साजरा करण्याबाबत चर्चा झाली.
गणेशोत्सवाच्या तयारीसाठी महापालिकेने कंबर कसली असून, त्यापूर्वी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विक्रेत्यांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी केले. शहरातील गोदावरी नदी व इतर चार उपनद्यांमध्ये प्रदूषण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. त्या दृष्टीने शहरासह उपनगरांमध्ये कृत्रिम तलाव उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
मागील वर्षी २००९ ठिकाणी गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले होते. विक्रेत्यांनी शाडू मातीच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. गणेशमूर्तीसाठी पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.गणेशमूर्ती विक्री करणाऱ्या स्टॉलधारकांना महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. शाडूच्या गणेशमूर्तींचा वापर जास्तीत जास्त व्हावा असाच गणेशोत्सव साजरा केला जावा.पर्यावरण पूरक आरास स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात.उत्कृष्ट मंडळांना बक्षीसे शासनाकडून दिले जाणार आहे त्या दृष्टीने समिती द्वारे मंडळाच्या पर्यावरण पूरक देखाव्याच्या आरसाची माहिती घ्यावी अशा सूचना या बैठकीत आयुक्त डॉ. करंजकर यांनी केल्या.
तसेच विसर्जन मिरवणूक मार्गावरील सर्व खड्डे बुजविण्याचे निर्देश यावेळी बांधकाम विभागाला दिले गेले.तसेच घनकचरा विभागामार्फत सर्वत्र स्वच्छता करणे आवश्यक आहे.तसेच नदी पात्रता निर्माल्य नागरिकांनी टाकू नये.टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आलेल्या आहे. दरम्यान शाडूच्या मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तीकारांना प्रत्येक विभागीय कार्यलयात जागा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णयदेखील पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. मनपाच्या ६ विभागीय कार्यलयामध्ये शाडू मातीचे स्टॉल उभारले जाणार असून शाडू मातीच्या मूर्ती माफक दरांमध्ये नागरिकांना उपलब्ध करून देण्यार असल्याची माहिती पर्यावरण विभागाचे उपआयुक्त डॉ.विजय कुमार मुंडे यांनी दिली.
Meeting to celebrate eco-friendly Ganeshotsav in Nashik Municipal Corporation