इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जिल्हा कांदा व्यापारी वर्गाच्या समस्यांबाबत व्यापारी असोसिएशनने आपल्या विविध मागण्यांकरिता मुख्यमंत्री व पणन मंत्री यांना मागण्यांबाबतचे निवेदन सादर केलेले आहे. नाशिक येथील जिल्हाधिकारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत या मागण्यांवर तोडगा न निघाल्यामुळे लासलगावसह जिल्ह्यातील सतरा कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा लिलाव बेमुदत बंद राहणार आहे. या बाजार समिती हे लिलाव बंद राहिल्यात एका दिवसात ३० ते ४० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प असल्याचे बोलले जात आहे.
सणासुदीच्या तोंडावर आणि दुष्काळाचे सावट असतांना पुन्हा बाजार समित्या बेमुदत बंद राहणार असल्याने कांद्यासह इतर शेतमाल उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होणार आहे. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या मागण्या बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात कुठलाही सकारात्मक तोडगा न निघाल्याने जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल होणार आहे.
व्यापाऱ्यांच्या मागण्या आज १९ सप्टेंबर पर्यंत मान्य न झाल्यास नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनच्या २० सप्टेंबरपासून कांदयाचे लिलाव कामकाजात जिल्हयातील कांदा व्यापारी सहभागी होणार नाही असे जिल्हयातील कांदा व्यापारी असोसिएशनचा निर्णय झालेला आहे. या बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलाणी, व्यापारी असोसिएशन जिल्हाध्यक्ष खंडू देवरे, कांदा व्यापारी संतोष अट्टल प्रवीण कदम, ऋषी सांगळे, अतुल शहा, सुरेश बाफना, नवीनकुमार सिंग यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Seventeen Agricultural Produce Market Committees of Lasalgaon and Districts closed indefinitely