नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकला दर बारा वर्षांनी होणाऱ्या सिहंस्थ कुंभमेळ्यामुळे जगभरातून भाविक येत असतात .सिहंस्थातील शाही पर्वण्यांना साधू-महंतांची व भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे साधू महंतांच्या सोयीसुविधांसाठी मनपा प्रशासनाकडून मोठे नियोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर साधू -महंतांच्या आखाड्यांच्या प्रमुखांनी मनपा प्रशासक तथा आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांची भेट घेतली त्यांचे स्वागत मनपाच्या वतीने आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांनी केले.
२०२७ मध्ये सिहंस्थ कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळा चार वर्षांचा कार्यकाळ असला तरी प्रशासकीय पातळीवर आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. साधू-महंतांनी गेल्यावेळी प्रमाणे येणाऱ्या सिहंस्थ कुंभमेळाला मूलभूत सोयी-सुविधांसह साधुग्राम साठी मुबलक जागा उपलब्ध करून देण्यात यावी व जागा अग्रेशीत करण्याची प्रक्रिया लवकर राबवावी या प्रमुख मागण्या डॉ.करंजकर यांच्याकडे साधू-महंतांनी केल्या.
तसेच साधू महंतांच्या ज्या काही सूचना असेल त्या सूचनांचे स्वागत केले जाईल असे डॉ.करंजकर यांनी भेटी दरम्यान सांगितले. यावेळी दिगंबर आखाडयांचे महंत श्री भक्तिचरण दासजी महाराज,श्री महंत रामकिशोरदासजी शास्त्री महाराज,खाकी आखाडयांचे महंत श्री भगवान दासजी महाराज,महंत श्री राजारामदासजी महाराज,तसेच आखाडा साधू-महंतांचे समन्वयक तथा निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे,स्वीयसचिव दिलीप काठे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यावेळी उपस्थित होते. यावेळी सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीतेसाठी लवकर तयारी सुरू केल्याबद्दल प्रशासक तथा आयुक्त डॉ अशोक करंजकर यांचे अभिनंदन सर्व साधू महंतांनी केले. साधु-महांतांच्याशिष्टमंडळाचे आभार मनपा जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी मानले.
Sadhu-Mahant met the municipal commissioners, this is the reason