नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तसेच गजरा ग्रुपचे चेअरमन हेमंत पारख यांचे इंदिरानगर येथील राहत्या घरासमोरून चारचाकी तसेच दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी अपहरण केल्याची घटना रात्री ९:४० वाजेच्या सुमारास घडली आहे.
ही अपहरणची घटना cctv कॅमेरेत कैद झाली आहे. या अपहरणानंतर त्यांना सुरत येथे सोडून देण्यात आल्याचे वृत्त आहे.
शनिवारी रात्री चार गुंड वाहनातून आले. त्यानंतर त्यांनी हेमंत पारख यांना चारचाकीत कोंबले आणि सुसाट वेगाने पळून गेले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरा जवळून हेमंत पारख यांचे अपहरण झाल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत तसेच पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला होता.
त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अपहरण कर्त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली आहे. त्याचबरोबर सीसीटीव्हीही तपासण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या घटनेमुळे नाशिक शहरासह इंदिरानगर भागात खळबळ उडाली. पारख यांचे अपहरण पूर्व वैमन्यस्यातून झाले का त्यांचे कुणाशी भांडण होते का, कोणी धमकी दिली होती हा अँगलही पोलिस तपासात करत असतांना त्यांना अपहरण केलेल्यांनी सुरत येथे सोडून दिल्याचे वृत्त आले.
पोलिसांना मध्यरात्री पारख यांचे शेवटचे लोकशन अंबेबहुला मिळाले होते. त्यानंतर पोलिसांचा शोध सुरु असतांना त्यांना सोडून देण्यात आल्याचे कळाले. पारख यांच्याकडून खंडणी घेऊन ही सुटका केल्याचे बोलले जात आहे. पारख यांना सोडून दिल्यानंतर अपहरण करणा-यांनी पळ काढला.
Kidnapping of Nashik construction businessman Hemant Parkh, Kidnapping incident caught on cctv camera