नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात १९ ते २८ सप्टेंबर दरम्यान साज-या होणा-या गणेशोत्सवात स्थानिक पोलीसांकडून परवानगी घेतलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना रोख पुरस्कार देण्यात येणार आहेत.
असे आहे पुरस्काराचे स्वरूप:-
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ-1 मध्ये व परिमंडळ-2 मध्ये अनुक्रमे प्रथम क्रमांक, व्दितीय क्रमांक,
तृतीय क्रमांक व दोन उत्तेजनार्थ असे परिमंडळ-1 मध्ये पाच व परिमंडळ-2 मध्ये पाच असे एकुण दहा रोख पुरस्कार देण्यात येणार आहेत.
1) प्रथम क्रमांक रूपये – 75,000/-
2) व्दितीय क्रमांक रूपये- 31,000/-
3) तृतीय क्रमांक रूपये- 11,000/-
4) उत्तेजनार्थ दोन बक्षिसे रूपये- 4100/-प्रत्येकी
( वरील दहा पुरस्कारांची एकुण रक्कम 2,50,400/- रूपये अशी आहे. )
पुरस्काराचे निकष:-
1)पर्यावरण गणेशमूर्ती, पर्यावरणपुरक सजावट व संरक्षणार्थ केलेली व्यवस्था.
मंडपाची साईज, सीसीटीव्ही यंत्रणा, ध्वनिक्षेपक मर्यादा पालन करणे.
गणेश मुर्तीचे ठिकाणी विज खंडीत झाल्यास पर्यायी व्यवस्था (10 मार्क )
2).स्वयंसेवकांची नेमणूक, शिस्त व स्त्रीपुरूष यांची स्वतंत्र व्यवस्था व भक्तांसाठी देण्यात आलेल्या इतर सुविधा.
सामाजिक सलोखा, समाजोपयोगी देखावा उदा. पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रध्दा निर्मूलन, स्वातंत्र्याच्या चळवळी संदर्भात देखावा इ.समाजप्रबोधनपर व सामाजिक सलोख्यासंदर्भात सजावट समाजोपयोगी घेतलेले कार्यक्रम जसे रक्तदान शिबिर, गडकिल्ले संरक्षण, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौरउर्जा बद्दल जागरूकता, अॅम्ब्युलन्स/ वैदयकीय केंद्रे चालविणे, विदयार्थ्याच्या शैक्षणिक/आरोग्यविषयक कार्य, महिला वंचित घटक यांचेविषयी कार्य. (20 मार्क )
3.) ध्वनिप्रदूषण रहीत वातावरण.ढोल, पारंपारिक वादय या संबंधाने पाळलेल्या ध्वनी संबंधाने डेसिबल मर्यादेचे पालन.
गणेश स्थापना ठिकाणी असणारी स्वच्छता व अन्य सुविधा (10 मार्क)
4.) मंडळांनी शासकीय नियमांचे केलेले पालन. रस्त्यास अडथळा निर्माण होणार नाही म्हणुन केलेले वाहतुक नियोजन (10 मार्क)
5.)विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात आलेले वाहन व त्याची व्यवस्था.
विसर्जन मिरवणुकीत वाहनातील गणेश मुर्तीचे मजबुत आसन व व्यवस्था
विसर्जन मिरवणुकीत विदयुत पुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी व्यवस्था (20 मार्क)
6.) विसर्जन मिरवणुकीत लावलेले पारंपारीक वादयांचे स्वरूप व शिस्त (10 मार्क)
7.) विसर्जन मिरवणुकीत केलेला गुलालाचा नियंत्रीत वापर तसेच जातीय सलोख्या संदर्भात नियोजन.
विसर्जन मार्गावर महत्वाचे ठिकाणे उदा. मशिद, दर्गा, मुस्लीम वस्ती, हॉस्पीटल इत्यादी ठिकाणी गणेश मंडळाने पाळलेली शिस्त.
(30 मार्क)
8.) मिरवणूक वेळेत पार पाडणे करीता व रेगांळु न देणेकरीता स्वयंसेवकाची कामगिरी.
दोन गणेश मंडळांमधील अंतर पडू न देण्यासाठी घेतलेली खबरदारी (20 मार्क)
9.) विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी वेळेत हजर होवुन पाळलेले नियम. (10 मार्क)
10.) विसर्जन मिरवणुकीत निर्धारीत वेळेत वादय बंद करणे व न रेंगाळता गणेश मुर्तीचे विसर्जन करणेसाठी मंडळांनी पाळलेली शिस्त. 10 मार्क
(एकुण-150 मार्क)
( मुद्दा 1 ते 4 गणेश स्थापना ते विसर्जन मिरवणुकीचे पुर्वी व मुद्दा 5 ते 10 गणेश विसर्जन मिरणूकी संदर्भाने )
गणेशमंडळामधून पात्र विजेत्यांची निवड करण्यासाठी परिमंडळ निहाय निवड समिती गठीत करण्यात आली असून सदर समिती गणेमंडळांना अचानक भेटी देवून निकषांनुसार परिक्षण करणार आहेत. त्यामुळे सर्व गणेशमंडळांनी वरिल निकषांप्रमाणे तयारी करावी. गणेश मंडळांना पोलीस आयुक्तालय स्तरावरील सदर बक्षिस योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी https://forms.gle/D2vdRTBXyTDzMKWr9 या लिंकवर जावून रजिस्ट्रेशन करणे आवष्यक आहे. सर्व गणेश मंडळांनी सदर बक्षिस योजनेमध्ये सहभागी व्हावे असे नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे आवाहन करण्यात येत आहे.
Nashik ganesh festival