नााशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये १८ सप्टेंबर अखेर ८१ टक्के साठा आहे. गंगापूर धरणाचा साठा ९६ टक्के तर समुहात ९१ टक्के साठा आहे. ३० जून अखेर जिल्ह्यातील धरणात २१ टक्के साठा होता तर गंगापूर धरणाचा साठा २९ टक्के तर समुहात २० टक्के साठा होता. पण, ७४ दिवसांमध्ये २४ प्रकल्पांमध्ये ६० टक्के वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील आळंदी, वाघाड, भावली, वालदेवी, भोजापूर, हरणबारी, केळझर ही सात धरणे ओव्हरप्लो झाली आहे. त्याचबरोबरच गंगापूर, पुणेगाव, दारणा, मुकणे, कडवा यासह १३ धरणे ही ७५ टक्केहून अधिक पाणीसाठा झाला आहे. तर काही धरणांचा साठा ९० टक्केहून अधिक आहे. त्याचप्रमाणे तिसगाव धरणात ३३ टक्के तर गिरणा धरणात ५४ टक्के साठा आहे. तर माणिकपुंज, नागासाक्या या दोन धरणाचा साठा शुन्य टक्के आहे.
गेल्या पावसाळ्यात जिल्हयातील जवळपास सर्व धरण भरली होती. त्यानंतर हा धरणसाठा कमी झाला होता. पण, आता पुन्हा वाढ झाली असून जिल्हयातील धरणाचा साठा ८१ टक्के झाला आहे.
7 dams in Nashik district are overflowing and this is the condition of other dams…..