इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरासह जिल्ह्यात चार दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून जवळपास धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. या पावसामुळे शहरातील नदी नाले सर्व वाहू लागले आहे. शहरातील रस्त्यांवरही पाणीच पाणी दिसत आहे. धरणात साठा वाढल्यामुळे पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
गंगापूर धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार चालू असल्यामुळे गंगापूर धरण पूर विसर्ग आज रोजी दुपारी ४ वाजता २२७२ क्यूसेस ने सोडण्यात आला आहे. तर नांदूर मधमेश्वर धरणातून दुपारी १ वाजता ४४६९ क्यूसेक्स होता. तीन वाजता १६१४ क्यूसेकने वाढवून एकूण ६०८३ क्यूसेक करण्यात आला आहे.
कडवा धरण क्षेत्रात तसेच पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असल्यामुळे कडवा धरण पूर विसर्ग आज दुपारी ४ वाजता ८४८ क्यूसेसने सोडण्यात आलेला आहे. अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.