इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणात पाणीसाठा वाढला असल्याने विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.आज सकाळी गंगापूर धरणातून २२७२ क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला होता, तो १० वाजता ११३६ क्युसेकने वाढवून एकूण ३४०८ क्युसेकने सोडण्यात आले. त्यानंतर ४ वाजता ११३६ व्युसेकने वाढवून ४५४४ क्युसेकने सोडण्यात आले त्यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने गोदा काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी, शनिवार व रविवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. गंगापूर धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा जलद गतीने वाढला आहे. यामुळे काल सायंकाळ पासूनच गंगापूर धरणातून विसर्ग सुरू करुन त्यात आता वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गोदावरी नदी खळखळून वाहत आहे.
गेल्या दोन दिवसामुळे सुरु असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणात पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे, तर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. तर नांदूरमधमेश्वर धरण व दारणा धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.