नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वडाळा रोड भागात भाडे तत्वावर चालविण्यासाठी घेतलेली तरुणाची कार भामट्यांनी परस्पर विक्री केल्याची घटना घडली. याबाबत मुंबईनाका पोलिस ठाण्यात विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जावेद मजिद शहा, हामिद माजिद शहा, इम्तियाज जफुउल्ला खान पठाण, अमोल राणे उर्फ मुन्ना, आशिष शर्मा (सर्व रा. वडाळा गाव) आणि अमोल भालेराव (रा. दत्त चौक) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत रवीप्रकाश रामसिंग कुशावह (वय २७) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गेल्या १८ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर दरम्यान ही घटना घडली.
संशयितांनी संगनमत करून कुशावह यांची इरटिगा कार शिल्लकने चालविण्यासाठी घेतली होती. मात्र संशयितांनी कुशावह यांची परवानगी न घेताच आपआपसाद खरेदीविक्री करून कारचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
- –