नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक नरेश कारडा यांच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. सदनिका खरेदी विक्री व्यवहारात महिलेस सव्वा आठरा लाखाची फसवणूक केल्याची ही तक्रार एक माहिलेने केली आहे. उपनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.
नरेश जगुमल कारडा (रा. ना.रोड) व प्रविण मुरलीधर जगताप (रा.सरस्वतीनगर,पंचक जेलरोड) अशी संशयितांची नावे असून, जगताप हे जनरल मुख्त्यारपत्रचे दस्त नोंदवून देणारे आहेत. याबाबत नंदिनी पवन उफाडे (रा.आनंदनगर नाशिकरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. उफाडे यांनी गेल्या १६ मार्च रोजी कारडा कन्स्ट्रक्शनच्या देवळाली शिवारातील हरीओमनगर येथील हरिकृष्ण फेज ४ या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील सदनिकाचा कारडा यांच्याशी व्यवहार केला होता. या सदनिकेसाठी उफाडे यांनी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेवून १८ लाख ३८ हजार ९६३ रूपयांची रक्कम कारडा यांना अदा केली होती.
फायनान्स कंपनीचे कर्ज असतांना कारडा यांनी मुदतीत बांधकाम पूर्ण करून ताबा न दिल्याने उफाडे यांची फसवणुक झाली असून, फायनान्स कंपनीने सदनिका लिलावात काढल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कोल्हे करीत आहेत. दरम्यान कारडा कन्स्ट्रक्शन या कंपनीविरोधात तक्रारींचा ओघ सुरू झाला असून उपनगर पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वीच चार कोटींच्या फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten