नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बँकेचे मोबाईल अॅप्लीकेशन लॅाग इन आणि आऊट करुन एकाने क्रेडिट कार्ड अॅक्टीव्हेटच्या बहाण्याने ४ लाख ६३ हजाराला गंडा घातला आहे. ऑनलाईन ही फसवणूक करण्यात आली असून या विरुध्द सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रेडिट कार्ड अॅक्टीव्हेट करण्याच्या बहाण्याने बँकेचे मोबाईल अॅप्लीकेशन वेळोवेळी लॉग इन आणि लॉग आऊट करण्यास सांगून भामट्यांनी ही फसवणुक केल्याचे सांगत सचनय सुचित चॅटर्जी (४० रा.चाणक्यनगर,खुटवडनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चॅटर्जी यांच्याशी गेल्या १० ऑक्टोबर रोजी १८६०४१९५५५५ या क्रमांकावरून भामट्यांनी संपर्क साधला होता.
क्रेडिट कार्ड अॅक्टीव्हेट करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी व्हेरीफिकेशन कोड घेवून त्यानंतर वारंवार बँकेचे मोबाईल अॅप्लीकेशन लॉग ईन व लॉग ऑऊट करण्यास सांगून बोलण्यात गुंतवून ४ लाख ६३ हजार ४६० रूपयांची रक्कम परस्पर काढून घेत लांबविली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेख करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten