नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणातून दांम्पत्याने जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार पाथर्डी फाटा भागात घडला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात विनयभंगासह अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय सुर्यवंशी व त्याची पत्नी (रा.दोघे पाथर्डी फाटा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दांम्पत्याचे नाव आहे. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार महिला व संशयित एकमेकांचे शेजारी असून पिडीतेची नात सायकल खेळत असल्याने दोघा कुटूंबियात वाद झाला होता. मंगळवारी (दि.७) याच कारणातून संतप्त दांम्पत्याने पिडीतेशी वाद घालत तिला दमदाटी करीत जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी संशयिताने महिलेचा विनयभंग केला. अधिक तपास सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख करीत आहेत.
जुगार खेळणा-या तिघांवर पोलिसांनी केली कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पेठरोडवरील मेघराज बेकरी भागात उघड्यावर जुगार खेळणा-या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष ओमप्रकाश अंबुरे (२१ रा.कालिका नगर,पंचवटी),प्रकाश राजू पुजारी (३० रा.लक्ष्मणनगर पेठरोड) व विजय कराडे अशी संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिस शिपाई पंकज चव्हाण यांनी फिर्याद दाखल केली आहे. मेघरात बेकरी भागात एका झाडाखाली काही तरूण जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता संशयित लोकांकडून अंक आकड्यावर पैसे लावून मिलन व टाईम बाजार नावाचा मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून ६३० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten