नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लग्नाचे आमिष दाखवून परिचीताने तरूणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयिताने दुस-या मुलीशी साखरपुडा केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजय जगताप (रा.ग्रीन फिल्ड अपा.शिवकॉलनी पांडवनगरी ) असे संशयिताचे नाव आहे. पीडिता व संशयित एकमेकांचे परिचीत असून त्यातून ही घटना घडली. संशयिताने मुलीस आपल्या राहत्या घरी बोलावून घेत लग्नाचे आमिष दाखविले. तुला आयुष्यभर सांभाळीन अशी ग्वाही देत संशयिताने मे २०२१ ते १३ नोव्हेंबर २०२३ दरम्यान वेळोवेळी युवतीवर बळजबरीने बलात्कार केला.
मात्र संशयिताने दुस-या मुलीशी साखरपुडा केल्याने पीडितेने जाब विचारला असता संशयिताने शिवीगाळ करीत तिला लग्न करण्यास नकार दिल्याने हा वाद पोलिसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनार करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten